राज ठाकरे संतापलेत, नगरसेवकांचे बंड म्यान

नाशिकमध्ये राजकीय नाट्य वेगळ्याच वळणावर आले आहे. मनसेच्या बालेकिल्ल्यात बंडखोरीची लागण झाली. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र उगारले. मात्र, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तात्काळ या पदाधिकाऱ्यांचे राजीनामेच स्वीकारले. माजी आमदार वसंत गीते यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. त्याच पद्धतीने राज यांनी धक्कातंत्र वापरत राजीनामा स्वीकारला.

Updated: Nov 5, 2014, 07:57 AM IST
राज ठाकरे संतापलेत,  नगरसेवकांचे बंड म्यान title=

मुंबई : नाशिकमध्ये राजकीय नाट्य वेगळ्याच वळणावर आले आहे. मनसेच्या बालेकिल्ल्यात बंडखोरीची लागण झाली. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र उगारले. मात्र, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तात्काळ या पदाधिकाऱ्यांचे राजीनामेच स्वीकारले. माजी आमदार वसंत गीते यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. त्याच पद्धतीने राज यांनी धक्कातंत्र वापरत राजीनामे स्वीकारलेत. तर नगरसेवकांनी आपले बंड म्यान केलं.

मनसेच्या ज्या पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिले त्या सर्वांचे राजीनामे मी स्वीकारलेले आहेत, असे राज ठाकरेंनी जाहीर केलंय. राजीनामे स्वीकारल्यामुळे माझ्यासोबत कोण आहे आणि कोण नाही हे तरी कळेल, असंही राज यांनी ठणकावून सांगितलं.

मुंबईतील नेते प्रविण दरेकर आणि नाशिकमधील पदाधिकारी अतुल चांडक, प्रदेश सरचिटणीस आणि माजी आमदार वसंत गीते यांनी आपल्या पदाचे राजीनामे सादर केले होते. त्यांच्या पाठोपाठ नाशिक जिल्हाध्यक्षांसह १५० पदाधिकार्‍यांनी आपले राजीनामे दिल्यामुळे मनसेला एकच हादरा बसला. एवढंच नाहीतर वसंत गीतेंसह अनेक नगरसेवक भाजप आणि सेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली. 

राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले होते. मात्र, राज ठाकरे यांनी प्रसिद्ध पत्रक जाहीर करुन मी त्यांचे राजीनामे स्वीकारत अल्याचे प्रसिद्धीला दिले. दरम्यान, नाशिकमधील सर्व नगरसेवकांनी राज यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतलाय. 

 मनसेच्या बालेकिल्ल्याला हादरा देणारे मनसेचे माजी आमदार वसंत गीते यांचं बंड आता थंड पडलंय. सर्व मनसेच्या नगरसेवकांनी गीतेंच्या सुरात सूर मिसळण्यास नकार देत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचा निर्णय घेतल्यामुळे गीते एकाकी पडल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.  

विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतर मनसेत सोमवारी अचानक राजीनामा सत्र सुरू झाले.  जिल्हाध्यक्षांसह १५० पदाधिकार्‍यांनी आपले राजीनामे दिले. आपल्या बाजूने सर्व नगरसेवक आहेत असे सांगत वसंत गीतेंनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. पण अखेरीस सर्व नगरसेवकांनी राज यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.