राज ठाकरेंनी घेतलं बाळासाहेबांचं अस्थिकलशाचं दर्शन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या अस्थिकलशांचे आज मुंबईसह देशभरात विसर्जन करण्यात आलं. देशभरात विविध ठिकाणी नद्या, संगम आणि जलाशयांमध्ये अस्थिकलशांचं विधिवत विसर्जन झालं.

Updated: Nov 23, 2012, 04:40 PM IST

www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या अस्थिकलशांचे आज मुंबईसह देशभरात विसर्जन करण्यात आलं. देशभरात विविध ठिकाणी नद्या, संगम आणि जलाशयांमध्ये अस्थिकलशांचं विधिवत विसर्जन झालं. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथील समुद्रात सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या हस्ते अस्थिकलशांचं विसर्जन करण्यात आलं.
यावेळी रश्मी ठाकरे तसंच आदित्य ठाकरेही उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्य़क्ष राज ठाकरे यांनीही उपस्थित राहून बाळासाहेबांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेतलं. बाळासाहेबांच्या अस्थिविसर्जनावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं गेट वे वर गर्दी केली होती.
याशिवाय पैठणमधील नाथसागर, नाशिक आणि नांदेडमधील गोदावरी, पुण्यातील इंद्रायणी नदी, नागपुरातील अंबाझरी तलाव, सिंधुदुर्गातील कुणकेश्वर, हिरण्येकेशी, जम्मू-कश्मीर, दिल्ली, उत्तर प्रदेश, केरळ या ठिकाणी अस्थिकलशांचं विसर्जन करण्यात आलं.