मुंबई : मनसेचा एकमेव आमदार विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आपल्याला पाडा पाडीच्या भूमिकेत रस नाही, सध्या राज्याच्या विकासासाठी स्थिर सरकारची गरज असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
हे २०१४ विधानसभेत मनसेकडून जुन्नर मतदार संघातून शरद सोनवणे निवडून आलेले एकमेव आमदार आहेत. शरद सोनवणे यांना भाजपने आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. मात्र आपण शेवटपर्यंत मनसेत राहणार असल्याचं शरद सोनवणे यांनी स्पष्ट केलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.