अणेंचा बोलविता धनी कोण? - राज ठाकरे

'श्रीहरी अणेंच्या मागचा बोलविता धनी कोण आहे हे पाहिले पाहिजे' असं सूचक वक्तव्य  आज राज ठाकरेंनी एका पत्रकार परिषदेत केलंय. हिवाळी अधिवेशना दरम्यान 'जय महाराष्ट्र' विरुद्ध 'जय विदर्भ'च्या घोषणा देण्यात आल्या होत्या, या विषयावर ते बोलत होते. 

Updated: Dec 9, 2015, 02:14 PM IST
अणेंचा बोलविता धनी कोण? - राज ठाकरे title=

मुंबई : 'श्रीहरी अणेंच्या मागचा बोलविता धनी कोण आहे हे पाहिले पाहिजे' असं सूचक वक्तव्य  आज राज ठाकरेंनी एका पत्रकार परिषदेत केलंय. हिवाळी अधिवेशना दरम्यान 'जय महाराष्ट्र' विरुद्ध 'जय विदर्भ'च्या घोषणा देण्यात आल्या होत्या, या विषयावर ते बोलत होते. 

यासोबत, वेगळ्या विदर्भाच्या मागणीचा समाचार घेत संपूर्ण महाराष्ट एक राहिलं पाहिजे, असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलंय. राज्याचे तुकडे पाडणं यामध्ये कोणतं हित आहे? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

अधिक वाचा - नागपुरात 'जय महाराष्ट्र' विरुद्ध 'जय विदर्भ'च्या घोषणा
 
'स्मार्ट सिटी योजना' फसवी
नरेंद्र मोदी सरकारची 'स्मार्ट सिटी योजना' फसवी असून हा केवळ केंद्राचा राजकीय खेळ असल्याची टीकाही त्यांनी केलीय. 

राज्य सरकारवर टीका करत, निवडणुकीच्या तोंडावर कल्याण-डोंबिवलीसाठी पॅकेज जाहीर केलं, पण शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत अशी टीकाही राज ठाकरेंनी केलीय. 

मोदींवर थेट टीका... 
मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्राला इन्कम टॅक्स देणार नसल्याचं सांगितलं होतं, मग आता राज्यांकडून मागणी का? महापालिकांमध्ये केंद्राची लुडबूड का? सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केलाय. शहरात चांगल्या योजना राबवण्यासाठी केंद्र-राज्याने पुढाकार द्यावा, त्याचं राजकारण करू नये... चांगल्या गोष्टींना माझा पाठिंबा असेल, मी विनाकारण राजकारण करणारा माणूस नाही, असं त्यांनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.