...आता तरी महाराष्ट्रात येणारे लोंढे थांबवा - राज ठाकरे

बिहारमध्ये महाआघाडीचा विजय आता निश्चित झालाय. नितीश कुमार यांचं सगळ्यांकडून अभिनंदन केलं जातंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही महाआघाडीचं अभिनंदन केलंय.  

Updated: Nov 8, 2015, 03:11 PM IST
...आता तरी महाराष्ट्रात येणारे लोंढे थांबवा - राज ठाकरे title=

मुंबई : बिहारमध्ये महाआघाडीचा विजय आता निश्चित झालाय. नितीश कुमार यांचं सगळ्यांकडून अभिनंदन केलं जातंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही महाआघाडीचं अभिनंदन केलंय.  

अधिक वाचा - नितिश कुमारांच्या गाजलेल्या गाण्याला मराठी मुलीचं संगीत

'ब्रॅन्ड मोदी'वर 'ब्रॅन्ड नितीश'नं मिळवलेला हा विजय आहे असं मानलं जातंय. यानंतर, आता तरी नितीश कुमारांनी आता महाराष्ट्रात येणारे लोंढे थांबवावेत, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. 

अधिक वाचा - महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर हेच चित्र दिसेल - राऊत

'प्रादेशिक अस्मिता, विकास आणि सामाजिक न्याय या त्रिसूत्रीवर आधारित राजकारणाचा हा विजय आहे. आता त्यांनी बिहारचा विकास इतक्या गतीनं करावा की महाराष्ट्रात येणारे लोंढे थांबवावेत... तसंच बिहारच्या विकासाची दिशा अशी असावी की राज्यामधून बाहेर गेलेले बिहारीही परत बिहारकडे यावेत... त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन!!' अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी नोंदवलीय. 

अधिक वाचा - बिहार निकालानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली वाढल्या

जितकी चर्चा नितीश कुमार यांच्या विजयावर सुरू आहे, तितकीच चर्चा भाजपच्या पराभवाचीदेखील आहे. बिहारमध्ये झालेला हा पराभव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा असल्याचं म्हटलं जातंय. यावरच, टिप्पणी करताना अमित शाह यांना कोपरखळी मारत, आता भाजपमध्ये 'शाह पे चर्चा' होईल, असं राज ठाकरेंनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.