नोटाबंदीचा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल - राज ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नोटाबंदीचा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय. प्रभादेवी इथल्या रविंद्र नाट्य मंदिरात आयोजित मुंबई-ठाण्यात पदाधिका-यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

Updated: Nov 19, 2016, 02:48 PM IST
नोटाबंदीचा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल - राज ठाकरे title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नोटाबंदीचा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय. प्रभादेवी इथल्या रविंद्र नाट्य मंदिरात आयोजित मुंबई-ठाण्यात पदाधिका-यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाचा फायदा होत असेल तर स्वागतच आहे. मात्र देशातली सद्यपरिस्थिती पाहता निर्णय अभ्यास न करताच घेतला असल्याचं राज म्हणालेत. 

काळा पैसा असणा-यांवर धाडी का टाकण्यात आल्या नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. नोटाबंदीवर भाजप नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंही मौन धारण केल्याचं राज म्हणालेत. 

निर्णय घेतल्यानंतर सकाळी हुंदके देत भावनिक आवाहन करणारे पंतप्रधान संध्याकाळी बारामतीत पवारांवर स्तुतीसुमने कसे काय उधळतात असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 2 हजाराच्या नोटा 6 महिन्यांआधी छापायला घेतल्या मग त्यावर उर्जित पटेलांची सही कशी अशी शंकाही राज यांनी उपस्थित केली.