शीना बोरा हत्या प्रकरणाची चौकशी मारियांकडेच राहणार

शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास राकेश मारिया आणि त्यांची टीम करेल, असे आज स्पष्ट करण्यात आले. राकेश मारियांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटवून त्यांच्या जागी अहमद जावेद यांची नियुक्ती करण्यात आली, त्यामुळे अनेक उलटसुलट चर्चा रंगू लागल्या होत्या. 

Updated: Sep 8, 2015, 11:23 PM IST
शीना बोरा हत्या प्रकरणाची चौकशी मारियांकडेच राहणार title=

मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास राकेश मारिया आणि त्यांची टीम करेल, असे आज स्पष्ट करण्यात आले. राकेश मारियांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटवून त्यांच्या जागी अहमद जावेद यांची नियुक्ती करण्यात आली, त्यामुळे अनेक उलटसुलट चर्चा रंगू लागल्या होत्या. 

मात्र, यापुढेही शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास राकेश मारियाच करणार असल्याची माहिती अतिरिक्त गृहसचिव के. पी. बक्षी यांनी दिली.

मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना आज अचानक बढती देण्यात आली. होमगार्डचे पोलीस महासंचालक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. शीना बोरा प्रकरणामुळे मारियांची बदली करण्यात आली अशीही चर्चा सुरु होती. मात्र, यापुढेही या प्रकरणाची चौकशी राकेश मारियाचं करणार आहेत.
 
राकेश मारिया यांनी गेल्या 3 आठवड्यांपासून शीना बोरा प्रकरणाचा तपास जातीनं सुरु ठेवला होता आणि यापुढेही मारियाच शीना बोरा हत्याप्रकरणाचा तपास करतील. 

राकेश मारिया यांचे पीटर मुखर्जींशी जवळचे संबंध असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे तडकाफडकी त्यांची आयुक्त पदावरुन उचलबागडी केली गेली अशी चर्चा होती. मात्र, आता शीना बोरा प्रकरणाचा तपास मारियाच करणार असल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.