मुंबई: शीना बोरा हत्याप्रकरणाच्या तपासाच्या मध्येच पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची उचलबांगडी करण्यात आलीय. आता त्यांना होमगार्डच्या महासंचालक पदावर बढती देण्यात आलीय.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलीस आयुक्तपद डीजी (महासंचालक) स्तरावरील अधिकारी सांभाळू शकतात. आता जेव्हा मारिया यांना प्रमोशन देत डीजी रँक देण्यात आलीय. तेव्हा पोलीस आयुक्त पदावर ठेवण्यात आलं नाही. ठेवायचं असतं तर सरकार प्रमोशन देऊन त्याच पदावर ठेवू शकले असते.
आणखी वाचा - शीना बोरा हत्याप्रकरणाचं 'आरुषी' होऊ देणार नाही - राकेश मारिया
राकेश मारिया यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबरला संपणार आहे. त्यापूर्वीच राकेश मारियांची उचलबांगडी करण्यात आली. मारियांवर शीना बोरा हत्याप्रकरणाच्या तपासात अधिक रस दाखवल्याचं बोललं जातंय. दाभोलकर, पानसरे हत्याप्रकरणांचा तपासही अशाच पद्धतीनं करायला हवा होता, अशी टीका त्यांच्यावर होतेय.
आता जावेद अमहद मुंबईचे नवे पोलीस आयुक्त झाले आहेत. कोण आहेत अमहद जावेद ... पाहा त्यांची कारकीर्द...
- अमहद जावेद हे १९८० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक कायदा सुव्यवस्था, म्हणून काम पाहिलं आहे.
- नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबादारी सांभाळलीय.
- नवी मुंबईत अहमद जावेद यांनी नागरिकांनाच आपला मोबाईल नंबर दिला होता. त्यामुळे नागरिक थेट आयुक्तांशी संपर्क साधून आपल्या अडचणी सांगायचे.
- तसंच त्यांनी महिलांसाठीही विशेष हेल्पलाईन सुरू केली होती.
- ते सध्या मुंबई होमगार्डचे पोलीस महासंचालक म्हणून काम सांभाळत होते.
आणखी वाचा - इंद्राणी मुखर्जीच शीनाची आई, DNA रिपोर्टचा शिक्कामोर्तब: मुंबई पोलीस
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.