राखी सावंतच्या भावावर असभ्य वर्तणुकीचा गुन्हा दाखल

वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी आयटम गर्ल राखी सावंतचा भाऊ राकेश सावंतला असभ्य वर्तणुकीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलीये. एका अभिनेत्रीने त्याच्यावर हा आरोप केलाय. शुक्रवारी रात्री तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केलीय. 

Updated: Jan 9, 2016, 03:04 PM IST
 राखी सावंतच्या भावावर असभ्य वर्तणुकीचा गुन्हा दाखल title=

मुंबई : वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी आयटम गर्ल राखी सावंतचा भाऊ राकेश सावंतला असभ्य वर्तणुकीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलीये. एका अभिनेत्रीने त्याच्यावर हा आरोप केलाय. शुक्रवारी रात्री तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केलीय. 

अभिनेत्रीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार तक्रारदार अभिनेत्री रात्री उशिरा आपल्या बॉयफ्रेंडसह कॉफी पिण्यास गेली होती. यावेळी राकेश आणि त्याच्या मित्रांनी तिच्याविरोधात अश्लील शेरेबाजी सुरु केली. याप्रकरणी अभिनेत्रीने ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीये. 

तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी राकेश सावंतला अटक केली. मात्र काही काळानंतर त्याला सोडण्यातही आले. दरम्यान, राकेश सावंतने अभिनेत्रीने केलेला आरोप फेटाळून लावलाय. बहीण राखी सावंत आणि आपली प्रतिमा खराब करण्यासाठी हे केल्याचे त्याने सांगितलेय. दरम्यान, पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहे.