डोंबिवली: एका 17 वर्षीय मुलीला बेशुद्ध करुन तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्या़त दाखल झालीये. डॉक्टारांनी त्या मुलीवर बलात्कार झाल्याचा रिपोर्ट दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे बलात्कार करणारे हे अल्पवयीन मुलीचे वर्गमित्र असल्याचं समोर आलंय.
23 तारखेला रात्री ही घटना घडली. सोमवारी संध्याकाळी दूध आणण्यासाठी घराबाहेर गेलेल्या तरुणीला वाढदिवसाचं निमित्त सांगून 5 ते 6 वर्गमित्रांनी गुंगीचं औषध देऊन शीतपेय पाजलं आणि नंतर निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, पीडित मुलीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
पोलीस याप्रकरणी कार्तिक नावाच्या एका आरोपीचा तपास करतायेत. ही घटना प्रथमदर्शनी बलात्काराची वाटतं असली तरी, हा गँगरेप असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. डॉक्टरांचा रिपोर्ट आल्यानंतर मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तत्काळ तपासाला सुरुवात केलीये.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.