पंकजा मुंडे-भुजबळांच्या भेटीच कारण अस्पष्टच

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतलीय.. मुंबईतल्या जे.जे. रुग्णालयात जाऊन भेट घेतलीय.. मनी लॉड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले भुजबळ सध्या डेंग्यूसदृष्य आजारामुळं जे.जे.रुग्णालयात दाखल आहेत. 

Updated: Sep 22, 2016, 01:42 PM IST
पंकजा मुंडे-भुजबळांच्या भेटीच कारण अस्पष्टच title=

मुंबई : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतलीय.. मुंबईतल्या जे.जे. रुग्णालयात जाऊन भेट घेतलीय.. मनी लॉड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले भुजबळ सध्या डेंग्यूसदृष्य आजारामुळं जे.जे.रुग्णालयात दाखल आहेत. 

या भेटीमागचे कारण स्पष्ट नसलं, तरी भुजबळ समर्थकांनी माळी मोर्चा काढण्याचे संकेत दिले होते. 

या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं बोललं जातंय. पंकजा मुंडे यांची फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात होत असलेली घुसमट आणि मराठा मोर्चा या पार्श्वभूमीवरही ही भेट महत्त्वाची मानली जातेय.