www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यातील वीस जिल्ह्यांमधील तब्बल ५९ हजार अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडी सेविकांचं एक जादा पद निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळं ५९ हजार महिलांना अंगणवाडी सेविका होण्याची संधी मिळेल.
सध्या प्रत्येक अंगणवाडीमध्ये एक सेविका आणि एक मदतनीस असतात. आता २० जिल्ह्यांमधील ५९ हजार अंगणवाड्यांमध्ये प्रत्येकी दोन सेविका आणि एक मदतनीस असतील. लवकरच हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी येणार आहे.
प्रत्येक अंगणवाडी सेविकेला दरमहा ४ हजार ५०० रुपये तर मदतनिसाला २ हजार रुपये मानधन दिलं जातम. या नवीन नियुक्तीमुळं शासकीय तिजोरीवर वार्षिक ३१८ कोटींचा बोजा येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.