आता, पिझ्झा घेऊन `ड्रोन` येणार तुमच्या दारात!

ट्रॅफिक... ही तर मुंबईकरांसाठी नेहमीचीच गोष्ट... आजकाल या गोष्टीचंही त्यांना काही वाटेनासं झालंय... पण, याच मुंबईत ट्राफिक हे कारण बाजुला सारत ग्राहकांना त्वरीत सेवा देण्यासाठी एका पिझ्झा आऊटलेटनं एक भारी शक्कल शोधून काढलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 22, 2014, 01:37 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ट्रॅफिक... ही तर मुंबईकरांसाठी नेहमीचीच गोष्ट... आजकाल या गोष्टीचंही त्यांना काही वाटेनासं झालंय... पण, याच मुंबईत ट्राफिक हे कारण बाजुला सारत ग्राहकांना त्वरीत सेवा देण्यासाठी एका पिझ्झा आऊटलेटनं एक भारी शक्कल शोधून काढलीय.
‘फ्रान्सिस्को पिझ्झेरिया’ या आऊटलेटनं देशात पहिल्यांदाच मानवरहित छोट्या विमानातून म्हणजेच ‘ड्रोन’च्या साहाय्यानं ग्राहकांपर्यंत पिझ्झा पोहण्यावण्याचं ठरवलंय. ‘आम्ही ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अमेझॉनद्वारे केल्या गेलेल्या ड्रोनच्या वापराबद्दल अनेक ठिकाणी वाचलं... त्यानंतर आम्ही यशस्वीपणे ड्रोनच्या साहाय्याने 11 मे रोजी आमच्या आऊटलेटमधून दीड किलोमीटर दूरवरच्या एका ग्राहकाकडे पिझ्झा पोहचवला. लोअर परेलमधून वरळीतील एका उत्तुंग टॉवरमध्ये दीड किलो पिझ्झाची डिलिव्हरी करण्यात आली. हे केवळ प्रयोगासाठी करण्यात आलं होतं... पण, भविष्यात या पद्धतीचा वापर चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो आणि ही पद्धती नियमित रुपात वापरात आणली जाऊ शकते’ असं फ्रान्सिस्को पिझ्झेरियाचे मुख्य कार्यकारी मिखेल रजनी यांनी म्हटलंय. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे डिलिव्हरी केल्याचा दावा रजनी यांनी केलाय.
येत्या चार-पाच वर्षात ही सगळ्यांसाठी अतिशय साधी गोष्ट होऊ शकेल. अशाप्रकारच्या कस्टमाइज्ड ड्रोनची किंमत जवळपास 2000 डॉलरच्या घरात आहे, असं रजनी यांनी म्हटलंय.
ड्रोनमुळे वेळ आणि पैसा दोघांची बचत होईल. एकदा २००० डॉलरची गुंतवणूक केली की पुढे फार खर्च नाही. ड्रोनच्या वापराला काही मर्यादा आहेत. आठ किमीच्या पुढे उड्डाण केल्यास बॅटरी रिचार्ज करावी लागते. आठ किलोपेक्षा जास्त भार पेलू शकत नाही. ४०० फूट अक्षांशापेक्षा जास्त उंचीवरून उड्डाण करू शकत नाहीत.
व्हिडिओ पाहा -

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.