मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे अनेक वर्षांनंतर प्रथमच सामना दैनिकाच्या पहिल्या पानावर दिसले आहेत.
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरेंना आणि त्यांच्या बातम्यांना ‘सामना’ या सेनेच्या मुखपत्रानं कधीच महत्त्व दिलं नाही. मात्र, सोमवारी बाळासाहेब ठाकरेंच्या दुसऱ्या स्मृतिदिनी राज ठाकरे शिवाजी पार्कवर आले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली... आणि त्यांच्याशी चर्चाही केली.
हे वृत्त सामनानं ठळकपणे मोठ्या फोटोसह छापलं आहेच, पण 'अब आयेंगे अच्छे दिन' असा मथळाही देण्यात आलाय... मीडियात ‘उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र’ अशीच चर्चा रंगली होती. ‘अब आएंगे अच्छे दिन’ हीच भावना शिवतीर्थापासून प्रसारमाध्यमांच्या कार्यालयापर्यंत होती, असाही उल्लेख या वृत्तामध्ये आवर्जुन करण्यात आलाय.
राज-उद्धव ठाकरेंच्या या भेटीनं नव्या राजकीय समीकरणांची नांदी दिली असताना सामनामध्ये राज ठाकरे दिसल्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.