सचिन तेंडुलकर कपिल शर्माच्या शोमध्ये जात नाही, कारण...

कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित असतात, मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अजुनही कपिलच्या शोमध्ये सामिल झालेला नाही.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 13, 2017, 06:57 PM IST
सचिन तेंडुलकर कपिल शर्माच्या शोमध्ये जात नाही, कारण... title=

मुंबई  : कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित असतात, मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अजुनही कपिलच्या शोमध्ये सामिल झालेला नाही. कपिलचा सचिन तेंडुलकरला शोमध्ये आणण्याचा नेहमी प्रयत्न असतो, पण त्याला कोणत्यानं कोणत्या कारणाने नकार मिळतो, मात्र सचिनने कोणत्या कारणाने नकार दिला हे खुद्द कपिलनेच सांगितले आहे.

'जे लोक चांगली कामं करतात, ज्यांचं आयुष्य प्रेरणादायी आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला मला माझ्या शोमध्ये आमंत्रित करायचं असतं', असतं कपिल सांगतो, तसेच मला लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर हे अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व वाटतात. ते माझा शो पाहतात. पण मी त्यांना शोमध्ये येण्याचं आमंत्रण देतो, तेव्हा आम्ही शोमध्ये येऊन काय बोलणार? असं ते म्हणतात.

माझ्या शोमध्ये धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन आले होते, तो अतिशय शानदार क्षण होता, असं कपिल शर्मा म्हणाला. लतादीदींनी मला एक घड्याळ भेट म्हणून दिलं आहे, जे मी सांभाळून ठेवलं आहे, असंही कपिलने म्हटलं आहे.