सलमान खानचा फैसला उद्या

2002 हीट अँड रन प्रकरणी सलमानच्या अपीलाबाबत आता उद्या निकाल येणार आहे. निकालाचं वाचन आज पूर्ण झालं.

Updated: Dec 9, 2015, 06:10 PM IST
सलमान खानचा फैसला उद्या  title=

मुंबई : 2002 हीट अँड रन प्रकरणी सलमानच्या अपीलाबाबत आता उद्या निकाल येणार आहे. निकालाचं वाचन आज पूर्ण झालं.

आज झालेल्या सुनावणी दरम्यान रवींद्र पाटील यांची साक्ष ग्राह्य धरता येणार नाही, असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं. शिवाय रविंद्र पाटील यांनी दिलेल्या जबाबावरुन पोलीसांनी सलमान खानवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला. 

पण रविंद्र पाटील यांनी दिलेला जबाब हा मॅजीस्ट्रेट समोर दिला होता. तर सत्र न्यायालयात सुरु असलेल्या साक्षी दरम्यान तो गैरहजर राहिला. दरम्यानच्या काळात त्यांना निलंबित करण्यात आलं. शिवाय ते फरार होते आणि त्यांचा मृत्यू कधी झाला हे पोलीसांना माहित देखील नव्हते, असंही कोर्टानं म्हटलंय. 

आता सलमानचं भवितव्य काय असेल, याचा फैसला उद्या होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.