www.24taas.com,मुंबई
हॉकी इंडिया लीगमध्ये मुंबई मॅजिशियन संघाकडून खेळणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंच्या समावेशावर शिवसेनेने जोरदार आक्षेप घेतला आहे. याविरोधात मुंबईतील हॉकी स्टेडियमवर हंगामा केलाय. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
आयपीएलच्या धर्तीवर भारतात हॉकी इंडिया लीग होत आहे. भारतात होत असलेल्या हॉकी इंडिया लीगमध्ये यानिमित्ताने नवा वाद उद्भवला आहे. मुंबई हॉकी असोसिएशनच्या स्टेडियमवर पाकिस्तानी हॉकीपटू सराव करत होते. यावेळी शिवसेनेने हॉकी स्टेडियमवर धाव घेत निदर्शनं केली.
हॉकी इंडिया लीगमध्ये पाकिस्तानी हॉकीपटूंना खेळवण्यास शिवसेनेने तीव्र विरोध करत सामने होवू देणार नाही, असा इशारा दिलाय.
हॉकी इंडिया लीगमध्ये एकूण पाच शहरांचे संघ खेळत आहेत. यात पाकिस्तानी हॉकीपटूंचा समावेश आहे. मोहम्मद इरफान, इम्रान बट्ट, रिझवान ज्युनीयर, रशिद महमूद, फरिद अहमद, मोहम्मद तौसिक, शफाकत रसुल, रशिद शाह आणि रिझवान ज्युनीयर आदींची नावे आहेत. त्यामुळे शिवसेने आक्षेप घेतला आहे.
शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी जोरदार विरोध केलाय. आम्ही या खेळाडूंना खेळू देणार नाही. तसेच पाकिस्तानी कलाकारांनाही येथे काम करू देणार नाही, असे बजावले आहे.