नवी दिल्ली : कंत्राटी कामगारांना दिवाळीच्या मुहुर्तावर सुप्रीम कोर्टानं आनंदाची बातमी दिलीये. कंत्राट पद्धतीवर काम करत असलेल्या देशभरातील लाखो कामगारांना कायम कामगारांइतकाच पगार द्या असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत.
समान कामासाठी समान वेतन हे तत्व आमलात आणावं आणि कंत्राटी कामगारांना कायम कामगारांइतकंच वेतन द्यावं असे आदेश न्यायमूर्ती जे.एस. केहर आणि न्यायमूर्ती एस. ए. बोबडे यांच्या खंडपिठानं दिलाय.
सर्वोच्च न्यायायलाचा निकाल हा कायदाच असतो त्यामुळे हा नियम तमाम कंत्राटी कामगारांना लागू होणार आहे..