लग्नही आता खर्चाचं नाही तर कमाईचं साधन

लग्नाशी संबंधित पण जरा हटके बातमी... तुम्ही लग्न करायचा विचार करत असाल तर तुम्हालाही ही बातमी उपयोगी ठरू शकते. कारण, लग्न करण्यासोबतच तुम्ही ते योग्यरित्या मॅनेज करुन कमाईसुद्धा करु शकता. 

Updated: Aug 2, 2016, 08:37 AM IST
लग्नही आता खर्चाचं नाही तर कमाईचं साधन

मुंबई : लग्नाशी संबंधित पण जरा हटके बातमी... तुम्ही लग्न करायचा विचार करत असाल तर तुम्हालाही ही बातमी उपयोगी ठरू शकते. कारण, लग्न करण्यासोबतच तुम्ही ते योग्यरित्या मॅनेज करुन कमाईसुद्धा करु शकता. 

Add Zee News as a Preferred Source

रुपेरी पडद्यावर दाखवल्या जाणाऱ्या लग्नाप्रमाणे तुम्हाला धुमधडाक्यात आणि शाही लग्न करायचंय...? मात्र तुमच्या स्वप्नातलं लग्न खिशाला परवडणारं नसेल तर काळजी करु नका. कारण तुम्ही तुमच्या लग्नाच्या पत्रिका विकू शकता. तुमच्या नातेवाईकांना नाही तर अनोळख्या व्यक्तींना... ज्यांना तुमच्या लग्नात धम्माल करायचीय...

ऊर्वी आणि परेश लवकरच गुजराती पद्धतीने लग्नबंधनात अडकणार आहेत... महागडे कपडे असो किंवा मग वऱ्हाडी मंडळींचं फाइव्ह स्टार स्वागत... यापैंकी कोणत्याही खर्चाची त्यांना चिंता नाही... कारण या दोघांनी आपल्या लग्नाच्या पत्रिका काही परदेशी नागरिकांना विकल्यात, जॉईन माय वेडिंग डॉटकॉमचे प्रमुख ओर्सी पार्कान्यी यांनी ही माहिती दिलीय.  

JOINMYWEDDING.COM या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमच्या लग्नाच्या पत्रिका विकू शकता. वऱ्हाडी मंडळींना कोणत्या सुविधा द्याव्या, कोणत्या गोष्टी विवाहसोळ्यात पार पडाव्यात, सोहळ्याची थीम कशी असावी अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं निवडता येतील. याशिवाय वऱ्हाडींचं स्वागत अनोळखी देशी नातेवाईक करणार की परदेशी? याची निवडही तुम्ही इथंच करु शकणार आहात. या संकेतस्थळावर लग्नाची पत्रिका विकल्यानंतर तुम्हाला १५ टक्के कमिशनही मिळणार आहे.

तुमच्या या पेड वऱ्हाडी मंडळींवर लक्ष ठेवण्याचं काम मात्र तुम्हालाच करावं लागणार आहे... काळ बदलतोय... तंत्रज्ञानामुळं अंतरच नाही तर अनेक समस्या चुटकीसरशी दूर होणार आहेत.

About the Author