बिहार निकालांचा परिणाम, 'धनत्रयोदशी'ला शेअर बाजार गडगडला

बिहारच्या निवडणूकीच्या निकालाचा थेट परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर बघायला मिळतोय. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सनं जोरदार आपटी खाल्लीय.

Updated: Nov 9, 2015, 05:13 PM IST
बिहार निकालांचा परिणाम, 'धनत्रयोदशी'ला शेअर बाजार गडगडला title=

मुंबई: बिहारच्या निवडणूकीच्या निकालाचा थेट परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर बघायला मिळतोय. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सनं जोरदार आपटी खाल्लीय.

आणखी वाचा - 'ब्रॅन्ड मोदी'ला 'ब्रॅन्ड नितीश'नं धक्का देणारं डोकं कुणाचं? पाहा...

आज धनत्रयोदशी आहे... शेअर बाजार नेहमी या दिवशी चांगला असतो... पण आज आठवड्याच्या सुरूवातीलाच बाजार उघडताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक ६०८ अंकांनी कोसळून २६ हजारांच्या खाली घसरला. तर निफ्टी ७,८०० च्या खाली पोचला.

आणखी वाचा -  दिवाळी आली, आपल्या घरातून काढून टाका या 8 वस्तू!

बिहार निवडणुकीत एनडीएच्या दारूण पराभवाचा परिणाम आज शेअर मार्केटवर पाहायला मिळतोय. सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स सहाशे अंकांनी पडला. पण त्यानंतर काही प्रमाणात खरेदी परतलीय. बिहारमध्ये भाजपचा पराभव होईल याची कुणकुण बाजाराला आधीच लागली होती. त्यामुळे बाजारातली घसरण गेल्या आठवड्यातच सुरू झाली होती. पण पराभव इतका दारूण असेल याची कुणालाच कल्पना नव्हती. त्यामुळे आज सुरुवातीला जोरदार आपटलेला बाजार आता काहीसा सावरलाय. पण अजूनही शुक्रवारच्या तुलनेत सेन्सेक्स आणि निफ्टी दीड टक्क्यांहून अधिक कोसळलेलच आहेत. 

बिहारमधल्या पराभवामुळे मोदी सरकारला आर्थिक सुधाराणांची विधेयकं पुढे रेटण्यात आणखी अडचणी येतील असा बाजाराचा अंदाज आहे. पण अशा अडचणी येणार नाहीत, असा विश्वास आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी व्यक्त केलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.