मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणात हत्येच्या दिवशी काय झाले होते. हे झी मीडियाच्या हाती लागले आहेत. त्या दिवशी काय घडले याचा घटनाक्रम पुढील प्रमाणे.
(राहुल मुखर्जी आणि शीना बोरा यांचे गेल्या सात वर्षांपासून संबंध होते. राहुल आणि शीना हे आपल्या शाले जीवनापासून एकमेकांजवळ आले. पण इंद्राणीचा याला विरोध होता. )
खून ज्या दिवशी झाला त्या दिवशी इंद्राणीने राहुल मुखर्जीला फोन केला होता. राहुलला सांगितले की शीनाला माझ्या घरी सोडून दे. राहुलने शीनाला वांद्रे येथील नॅशनल कॉलेजमधून घेतले आणि इंद्राणीकडे सोडले.
अधिक वाचा - हायप्रोफाईल हत्याकांड : 'एच आर' ते सीईओ पदापर्यंतचा इंद्राणीचा प्रवास
त्यानंतर इंद्राणीने ड्रायव्हरच्या मदतीने जबरदस्ती शीनाला रायगडला घेऊन गेली. तिला एका जंगलात नेले. या ठिकाणी शीनाची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिला जाळण्यात आले.
या नंतर राहुल अनेक पोलिस स्टेशनमध्ये गेला, त्याने शीना हरवली असल्याचे तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला पण त्याला कोणीही दाद दिली नाही.
अधिक वाचा - शीना ही बहिण नाही तर मुलगी होती; इंद्राणीची धक्कादायक कबुली
इंद्राणी मुखर्जी हिला कोणत्याही पतीने या गुन्ह्यात मदत केली नव्हती असे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी इंद्राणी मुखर्जी हिची चौकशी केल्यानंतर शीखा वोरा हत्या प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळालंय. शीखा ही इंद्राणीची बहिण नसून तिची मुलगी असल्याचं धक्कादायक सत्य या तपासात पुढे आलंय.
इंद्राणी मुखर्जीला अटक
ड्रायव्हरनं शीनाची हत्या आपण इंद्राणीच्या सांगण्यावरून केल्याचं कबूल केल्यानंतर पोलिसांनी ४३ वर्षीय इंद्राणीला अटक केलीय. त्यानंतर इंद्राणीनं खुनाचा कबुली जबाब देत शीना ही आपलीच मुलगी असल्याचं कबूल केलंय.
शीना हिनं मुंबईच्या सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. २०१२ मध्ये जेव्हा शीना मुंबईतून अचानक गायब झाली त्यावेळी ती २४ वर्षांची होती आणि रिलायन्स ADAG कंपनीत कामाला होती.
इंद्राणी - मिखाईल इंद्राणीचीच मुलं...
'टेलिग्राफ'नं दिलेल्या बातमीनुसार, इंद्राणीच्या नातेवाईकांनीही शीना ही इंद्राणीची मुलगी असल्याचं सांगितलंय. इतकचं नाही तर, इंद्राणीला शीनासोबत आणखी एक मुलगाही - मिखाईल आहे. 'आपला बराच वेळ कोलकाता आणि त्रिपुरामध्ये व्यतीत करणाऱ्या व्यक्तीसोबत असलेल्या संबंधातून' इंद्राणीला हे दोन अपत्य आहेत. त्यानंतर, इंद्राणीनं अनेकदा कोलकाता आणि जमशेदपूरमध्ये दौरा करणाऱ्या पीटर मुखर्जी यांच्यासोबत विवाह केला.
इंद्राणीनं शीनाची बहिण म्हणून करून दिली ओळख
शीना आणि तिचा भाऊ इंद्राणीच्या आई-वडिलांकडेच गुवाहाटीमध्ये लहानाचे मोठे झाले. शीनाचा भाऊ सध्या एका एअरलाईनमध्ये कामाला आहे. शीना आणि तिचा भाऊ जेव्हा मुंबईला शिक्षणासाठी दाखल झाले तेव्हा इंद्राणीनं शीनाची ओळख आपली बहिण म्हणून करून दिली. शीना ही त्यावेळी इंद्राणी आणि पीटरच्याच घरी राहत होती.
शीनाचे पीटर यांच्या मुलासोबत संबंध
'फर्स्टपोस्ट'नं दिलेल्या माहितीनुसार, इंद्राणीची बहिण म्हणून मुखर्जी यांच्या घरात दाखल झालेल्या शीनाचे पीटर यांच्या मुलासोबत (पहिल्या लग्नापासून झालेला मुलगा) संबंध जुळले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.