रायगडच्या जंगलात सापडले शीनाच्या मृतदेहाचे अवशेष

आज सकाळी शीना बोरा हत्या प्रकरणी मुंबई पोलिसांचं पथक रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये दाखल झालं. इथल्या जंगलात त्यांना शीनाच्या मृतदेहाचे अवशेष सापडले आहेत. दरम्यान, या हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जीसोबतच तिचा माजी पती संजीव खन्ना यालादेखील ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 

Updated: Aug 28, 2015, 03:15 PM IST
रायगडच्या जंगलात सापडले शीनाच्या मृतदेहाचे अवशेष title=

मुंबई : आज सकाळी शीना बोरा हत्या प्रकरणी मुंबई पोलिसांचं पथक रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये दाखल झालं. इथल्या जंगलात त्यांना शीनाच्या मृतदेहाचे अवशेष सापडले आहेत. दरम्यान, या हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जीसोबतच तिचा माजी पती संजीव खन्ना यालादेखील ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 

पेण तालुक्यातील गागोदे गावाजवळ जंगल भागात जिथे शीना बोरा हिचा मृतदेह सापडला होता. त्या ठिकाणी खोदकाम करुन पुरावा शोधण्याचे प्रयत्न पोलिसांनी केला. यासाठी मुंबई  पोलिसांचे  १० जणांचं पथक, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच कलिना येथील फोरॅन्सिक लॅबची टीम गागोदे जंगलात दाखल झाले होतं. 

अधिक वाचा : शीना बोरा हत्याकांड आत्तापर्यंत... 

पोलिसांना प्रतिक्षा डीएनए रिपोर्टची
मुंबई पोलिसांना प्रतिक्षा आहे शीनाच्या डीएनए रिपोर्टची... मे २०१२ मध्ये ही घटना घडली. त्यावेळी पेण पोलीसांनी एका महिलेच्या मृतदेहाच्या उजव्या हाताचं हाड मुंबईतील कलिना फॉरेन्सिक प्रयोगशाळेत चाचणी करता पाठवले होते, असा दावा पेण पोलिसांनी केलाय. या अहवालानंतर तो मृतदेह शीनाचाच होता की नाही हे स्पष्ट होईल. 


पोलिसांची टीम रायगडमध्ये...

तपास थांबवणारा 'तो' आयपीएस अधिकारी कोण?
मात्र, मिळालेल्या माहितीनुसार पेण पोलीसांनी अपघाती मृत्यू म्हणून त्या मृतदेहाचा विल्हेवाट लावली होती. मग आता फॉरेन्सीक लॅबमध्ये पाठवलेले नमुने कोणाचे, हा प्रश्न निर्माण झालाय.
शिवाय,  दरम्यान, या हत्याकांडाचे धागेदोरे एका आयपीएस अधिकाऱ्यापर्यंतही पोहचलेत. या अधिकाऱ्यानं  या प्रकरणाचा तपास थांबवत हे दाबण्याचा प्रयत्न केल्याचंही समोर आलंय. हा अधिकारी इंद्राणी मुखर्जीचा जवळचा आहे का? याचाही शोध सुरू आहे.  

मिखाईल पुराव्यांसह पोलिसांसमोर
शीना बोराचा सख्खा भाऊ मिखाईलला मुंबईमध्ये दाखल झालाय. त्याच्याकडे 4 फोटो, काही कागदपत्रं, एक ऑडिओ क्लिप आहे. या पुराव्यांच्या आधारे आणि त्याचा जबाब घेतल्यानंतर पुन्हा इंद्राणीची चौकशी केली जाणार आहे. तसंच मिखाईलनंतर पोलिसांनी पीटरनाही पाचारण केलंय. खार पोलीस स्टेशनमध्ये आजच पीटर यांचीही पुन्हा चौकशी केली जाणार आहे. 

  

  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.