शिवसेना भाजप विरोधात मतदान करणार - रामदास कदम

शिवसेना विरोधी बाकावर बसणार आहे. भाजपकडून ठोस भूमिका न घेतल्याने उद्याच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आणि विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात शिवसेना मतदान करणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी रात्री उशिरा दिली. त्यामुळे पुन्हा सुरु झालेली भाजपबरोबरची सकारात्मक चर्चा फोल ठरली आहे.

Updated: Nov 11, 2014, 11:50 PM IST
शिवसेना भाजप विरोधात मतदान करणार - रामदास कदम title=

मुंबई : शिवसेना विरोधी बाकावर बसणार आहे. भाजपकडून ठोस भूमिका न घेतल्याने उद्याच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आणि विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात शिवसेना मतदान करणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी रात्री उशिरा दिली. त्यामुळे पुन्हा सुरु झालेली भाजपबरोबरची सकारात्मक चर्चा फोल ठरली आहे.

शिवसेना-भाजपमधील चर्चा पुन्हा सकारात्मक दिशेनं सुरू झाल्याचं सांगण्यात येत होतं. शिवसेनेला भाजपकडून चांगल्या प्रस्तावाची अपेक्षा होती. उद्या सकाळपर्यंत शिवसेना याबाबत प्रतीक्षा करणार करणार होती. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने माघार घ्यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला. यावेळी उद्धव यांनी भाजपच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. आधी काय तो निर्णय घ्या, नंतर याबाबत स्पष्ट करण्यात येईल, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले. मात्र, भाजप आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आम्ही विरोधात बसण्याचा निर्णय घेतल्याने रामदास कदम यांनी सांगितले.

निकोप लोकशाहीसाठी अध्यक्षपदाची निवडणूक टाळावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलीय. निवडणूक लढणाऱ्या पक्षांशी आपण चर्चा करू असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच शिवसेनेच्या पाठिंब्याबाबतही भाजप आशावादी असल्याचं मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलं. तर शिवसेनेनं पाठिंबा दिला तर आनंदच होईल, असं मत केंद्रीयमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी व्यक्त केलं. मुनगंटीवार यांनी मात्र राष्ट्रवादी पाठिंब्याच्या बदल्यात काही अपेक्षा करत असेल तर भाजप ती पूर्ण करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.