मुंबईत समारोप सभेवरून शिवसेना-मनसे पुन्हा आमने-सामने

महापालिका निवडणुकीत समारोपाच्या सभेवरून शिवसेना-मनसे पुन्हा आमने-सामने आलेत. 18 फेब्रुवारीला मनसेची समारोपाची प्रचार सभा दादरमध्ये दत्ता राऊळ मैदानात व्हावी यासाठी मनसे आग्रही आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 15, 2017, 09:03 AM IST
मुंबईत समारोप सभेवरून शिवसेना-मनसे पुन्हा आमने-सामने title=

मुंबई : महापालिका निवडणुकीत समारोपाच्या सभेवरून शिवसेना-मनसे पुन्हा आमने-सामने आलेत. 18 फेब्रुवारीला मनसेची समारोपाची प्रचार सभा दादरमध्ये दत्ता राऊळ मैदानात व्हावी यासाठी मनसे आग्रही आहे. 

मात्र मनसेआधीच शिवसेनेने या मैदानासाठी परवानगी मागितलीय. तर 18 फेब्रुवारीला शिवसेनेची जाहीर सभा बीकेसी मैदानावर होणार आहे. त्यामुले शिवसेनेने मैदानावरचा दावा सोडावा अशी मागणी मनसेने केलीय. मात्र शिवसेना या मैदानावरील दावा सोडण्यास तयार नाही. 

स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी या मैदानाचे शुल्क भरलेय. त्यामुळे या मैदानावरून शिवसेना-मनसे वाद पुन्हा एकदा रंगणार आहे. राज ठाकरे यांची सभा दादरमध्ये होऊ नये यासाठी शिवसेना रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप मनसेनं केलाय.