मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक जवळ आली असतानाच भाजपने शिवसेनेची मतपेटी असलेल्या क्षेत्रात जोरदार विकासकामाचा दणका लावला आहे. आज भाजपाच्या मुंबईतील आमदारासमवेत बैठक घेत वेगवेगळ्या प्रश्न सोडवण्याचे आदेश दिलेत.
मुंबई उपनगर भाडेकरू व्याप्त मोडकळीस इमारतीचा पुर्नविकासाचा मार्ग मोकळा झाला. मुंबई उपनगरातील सुमारे दहा हजार भाडेकरू घरांना याचा फायदा होणार आहे. मागील पंधरा वर्ष हा मुद्दा प्रलंबित होता, असे ग्रुहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली.
उपनगरातील ३७ -ए वन इमारतीच्या पुर्नविकास मार्ग करण्याबाबत नोटीफेकेशन काढण्यात आले. वरळी, एन एम जोशी रोडवरील बीडीडी चाळी प्रमाणेच शिवडीतील बीडीडी चाळ टेंडर काम लवकर केले जाईल. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कॅबिनेटसमोर प्रस्ताव दिला, त्यास लवकर मान्यता मिळेल. शिवडी बीडीडी चाळ पुर्नविकास केला जाईल, अशी माहिती मेहता यांनी दिली.