शिवसेना विधान परिषद सभापती निवडणूक लढवणार

विधान परिषद सभापतीपदाच्या निवडणुकीत उडी घेण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतलाय. शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे अर्ज भरणार असून भाजप आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, असं शिवसेनेनं सांगितलंय. 

Updated: Mar 19, 2015, 11:01 AM IST
शिवसेना विधान परिषद सभापती निवडणूक लढवणार title=

मुंबई: विधान परिषद सभापतीपदाच्या निवडणुकीत उडी घेण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतलाय. शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे अर्ज भरणार असून भाजप आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, असं शिवसेनेनं सांगितलंय. 

मात्र भाजपला कोंडीत पकडण्याचा हा नवा असल्याचं आता बोललं जातंय. सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यावरील अविश्वास ठरावात भाजपनं राष्ट्रवादीला साथ दिली होती. मात्र आता राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा मुकाबला झाल्यास भाजपा कुणाच्या बाजूनं उभा राहणार, असा प्रश्न आहे.

भाजप आणि राष्ट्रवादीची छुपी युती उघड करण्यासाठी शिवसेनेनं ही खेळी खेळली नाहीये ना, अशी शंका आता उपस्थित होतेय... '

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.