राणेंनी विधानसभा लढवली, तर भाजपाचा शिवसेनेला पाठिंबा?

वांद्रे विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी नारायण राणे यांना काँग्रेसने तिकीट दिलं, तर या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

Updated: Mar 18, 2015, 06:21 PM IST
राणेंनी विधानसभा लढवली, तर भाजपाचा शिवसेनेला पाठिंबा? title=

मुंबई : वांद्रे विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी नारायण राणे यांना काँग्रेसने तिकीट दिलं, तर या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

ही बातमी अशा वेळी आली आहे, जेव्हा नारायण राणे यांनी म्हटलंय, जर पक्षाने आपल्याला वांद्रे विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी तिकीट दिलं तर आपण निवडणूक लढवू.

यानंतर मात्र जर नारायण राणे विधानसभेची ही पोट निवडणूक लढवत असतील तर आपण शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची भूमिका आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. नारायण राणे यांना विधानसभेपर्यंत येण्यास रोखण्यासाठी भाजपने शिवसेनेला हा पाठिंबा देऊ केला असल्याचं बोललं जातं आहे.

शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनानंतर वांद्रे विधानसभेची जागा रिक्त झाली होती, यानंतर ही वांद्रे विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे, दुसरीकडे आर.आर.पाटील यांच्या निधनानंतर तासगाव मतदार संघाची निवडणूक होणार आहे, या ठिकाणी राष्ट्रवादीकडून आर.आर.पाटील यांच्या पत्नी सूमन पाटील यांना तिकीट दिलं जाणार असल्याचं सांगण्यात येतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.