खडसेंचा राजीनामा घेण्यासाठी शिवसेनेचा दबाव

शिवसेना - भाजप युती तोडण्याचा निर्णय शिवसेनेला कळवणाऱ्या महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा वचपा काढण्याची संधी शिवसेनेनं साधलीय.

Updated: Jun 2, 2016, 02:41 PM IST
खडसेंचा राजीनामा घेण्यासाठी शिवसेनेचा दबाव title=

मुंबई : शिवसेना - भाजप युती तोडण्याचा निर्णय शिवसेनेला कळवणाऱ्या महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा वचपा काढण्याची संधी शिवसेनेनं साधलीय.

 

खडसेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी शिवसेनेनं भाजपवर दबाव वाढवलाय. भाजप स्वच्छ आहे तर मग खडसेंच्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का असा सवाल शिवसेनेनं केलाय.

 

मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर निर्णय़ घ्यावा असा सल्लाही शिवसेनेनं दिलाय. खडसे स्वच्छ असतील तर सांगा अन्यथा आरोप खरे असतील कर कारवाई करा, अशी थेट मागणी शिवसेनेनं केलीय.