मुंबई : मुंबईच्या महापौरपद निवडणुकीत शिवसेनेच्या सौ. स्नेहल आंबेकर यांनी बाजी मारत मुबई शहराचा प्रथम नागरीक होण्याचा मान पटकावला. त्यांनी काँग्रेस उमेदवार सावंत यांचा ५७ मतांनी पराभव केला.
स्नेहल आंबेकर यांनी काँग्रेसच्या प्रियतमा सावंत यांचा ५७ मतांनी पराभव केला. आंबेकर यांना 121 तर सावंत यांना केवळ ६४ मतं पडलीत. या निवडणुकीत मनसेची भूमिका महत्वाची ठरणार होती. मात्र, जारी केलेला व्हीप मागे घेत नगरसेवकांना अनुपस्थित राहण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मनसे या निवडणुकीत भाग घेतला नाही. तसेच सपा नगरसेवकांनी अनुपस्थिती दर्शविली.
शिवसेनेच्या नगरसेविका स्नेहल आंबेकर या पहिला महिला अनुसूचित जातीच्या महापौरपद झाल्यात. दरम्यान उपमहापौरपदासाठी भाजपच्या अलका केरकर यांनी अर्ज भरलाय. अद्याप याचा निकाल जाहीर झालेला नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.