नाइट लाइफवरून पुन्हा शिवसेना-भाजप संघर्ष पेटणार?

मुंबईच्या नाइट-लाइफसाठी राज्याचं गृहमंत्रालय फारसं उत्सूक नाही... सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढेल, असं मंत्रालयातल्या काही अधिकाऱ्यांचं मत आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त आणि शिवसेनेला मात्र तसं वाटत नाही. यामुळे एका नव्या संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झालीये.

Updated: May 2, 2015, 06:26 PM IST
नाइट लाइफवरून पुन्हा शिवसेना-भाजप संघर्ष पेटणार?  title=

मुंबई: मुंबईच्या नाइट-लाइफसाठी राज्याचं गृहमंत्रालय फारसं उत्सूक नाही... सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढेल, असं मंत्रालयातल्या काही अधिकाऱ्यांचं मत आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त आणि शिवसेनेला मात्र तसं वाटत नाही. यामुळे एका नव्या संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झालीये.
 
मुंबईत रात्री-अपरात्री काम करणाऱ्यांना आणि नाइट लाइफचा शौक असलेल्यांना या प्रश्नांची उत्तरं लवकर हवी आहेत. मुंबई हायकोर्टात यावर सुनावणी होणार असताना मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया आणि राज्य सरकारचं गृहमंत्रालय मात्र दोन ध्रुवांवर असल्याचं दिसतंय. गृहमंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार २४ तास बार, पब, डिस्को सुरू ठेवल्यामुळं शहरातली गुन्हेगारी वाढू शकते...  कारण

१. नाइट लाइफचा फायदा केवळ कॉल सेंटर, बीपीओ आणि एव्हिएशन उद्योगातल्या कर्मचाऱ्यांनाच होईल
२. यामुळे शहरात लुटमार, सोनसाखळी चोरीच्या घटना वाढू शकतात
३. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक 'हॉटेलमध्ये गेले होतो' असं सहज सांगून सुटू शकतात
४. याचा पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांवर अकारण ताण येईल.

खात्याचा नसला, तरी आयुक्तांचा मात्र मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. मुंबईतले हॉटेल व्यावसायिकांनीही नाइट लाइफ पूर्ण नाही, तर निदान अंशतः सुरू करावी, अशी मागणी केलीये.

बॉलिवूड सेलिब्रेटीदेखील नाइट लाइफ पुन्हा सुरू होण्यासाठी आसुसल्याचं दिसतंय. एकीकडे गृहमंत्रालय आणि पोलीस आयुक्तांचं यावर दुमत असतांना शिवसेना आणि भाजपमध्ये देखील यावरून पुन्हा वाद होण्याची चिन्हं आहेत... शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे खुलेपणानं नाइट लाइफचं समर्थन करतायत आणि राज्याचं गृहमंत्रालय मात्र भाजपकडे, त्यातही मुख्यमंत्र्यांकडे आहे... तशात १६ जूनला मुंबई हायकोर्टात राज्य सरकार काय भूमिका मांडणार यावर नाइट लाइफचं भवितव्य बरचसं अवलंबून आहे.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.