शिवसेनेची उद्या बैठक, या मंत्र्यांवर टांगती तलवार

शिवसेनेची उद्या महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मंत्रीमंडळ आणि संघटनात्मक फेरबदलाबाबत चर्चा होणार आहे. 

Updated: Apr 5, 2017, 10:27 PM IST
शिवसेनेची उद्या बैठक, या मंत्र्यांवर टांगती तलवार  title=

मुंबई : शिवसेनेची उद्या महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मंत्रीमंडळ आणि संघटनात्मक फेरबदलाबाबत चर्चा होणार आहे. शिवसेनेकडून सुभाष देसाई, दिवाकर रावते आणि दीपक सावंत यांना मंत्रीमंडळातून डच्चू मिळेल तर रामदास कदम हे मंत्रीपदावर कायम राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

तसंच शिवसेनेकडून नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे आमदार त्यांच्याच मंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. या नाराजीची दखल पक्षनेतृत्वाकडून घेतल्याचं बोललं जात आहे.