मुंबईत शोध मराठी मनाचा संम्मेलनाचे पवारांच्या हस्ते उद्घाटन

जागतिक मराठी अकादमी आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ  आयोजित शोध मराठी मनाचा या संम्मेलनाचं उद्घाटन मुंबईत माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले.

Updated: Jan 7, 2017, 10:05 PM IST
मुंबईत शोध मराठी मनाचा संम्मेलनाचे पवारांच्या हस्ते उद्घाटन title=

मुंबई : जागतिक मराठी अकादमी आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ  आयोजित शोध मराठी मनाचा या संम्मेलनाचं उद्घाटन मुंबईत माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले.

संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून मूळचे लातूर जिल्ह्यातील असलेले अमेरिकेतील उद्योगपती अविनाश राचमाले होते. रामदास फुटाणे, यशवंतराव गडाख, शशी भालेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या संमेलनात दोन दिवस विविध परिसंवाद, चर्चासत्र, मान्यवरांच्या मुलाखती असा भरगच्च कार्यक्रम आहे.

यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी आणि नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर आणि अभिनेते दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. शरद पवार यांनी यावेळी सचिन पिळगावकरांच्या कट्यार काळजात घुसली या सिनेमाचं विशेष कौतुक केलं. आजच्या युवा पिढीला या सिनेमामुळे शास्त्रीय संगीताची गोडी अनुभवायला मिळाली, असं पवार म्हणाले.