मुंबई : मुंबई स्थित सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनं आता दुष्काळग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतलाय. हे ट्रस्ट आता या मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च करणार आहे.
कायदा आणि न्याय विभागानं एक सरकारी प्रस्ताव (जीआर) काढलाय. यामध्ये, सिद्धिविनाय मंदिर ट्रस्टला दुष्काळ आणि पूरानं त्रासलेल्या आत्महत्येचा मार्ग स्वीकारलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यासंबंधी सुचवण्यात आलंय.
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनंही या जीआरची कॉपी सगळ्या जिल्हा कलेक्टर्सना देऊन त्यांना शेतकरी आणि त्यांच्या मुलांची माहिती देण्याची विनंती केलीय, अशी माहिती ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पाटिल यांनी दिलीय.
जीआर जारी केलेल्या दिसवसापासून मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यात येणार आहे. एक करोड रुपयांची ही योजना 'सिद्धिविनायक स्कॉलरशिप स्कीम'च्या नावानं ओळखली जाणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, मंदिराची वार्षिक कमाई ६५ करोड रुपये आहे. मंदिराच्या इतरही काही योजना सुरू आहे.