मुंबई : कॉलेज बाहेरील टवाळखोरांच्या जाचाला कंटाळून सेल्वी कोनार या तरुणीनं आत्महत्या केलीय. या घटनेनंतर संबंधीत तरुणाला अटक झाली मात्र कॉलेजबाहेर अशा टवाळखोरांचं काम काय असा प्रश्न उपस्थीत होतोय.
अधिक वाचा - फेसबुकवरील मैत्री जीवावर, अल्पवयीन मुलीची आत्महत्या
वडाळ्याच्या 'एसआयडब्ल्यूएस' महाविद्यालयात शिकणारी सेल्वी कोनार हिनं वीष प्राशन करुन आत्महत्या केली. सेल्वीच्या एका मैत्रीणीनं कॉलेज बाहेर उभ्या असलेल्या टोळक्यातील ईलाई राजा या २३ वर्षीय मुलाशी तिची ओळख करुन दिली होती. ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं आणि गोड बोलून ईलाईनं सेल्वीकडून सोन्याची चैन घेतली. चैन परत न देता तो तिला ब्लॅकमेल करु लागला. याबद्दल सेल्वीनं तिच्या मित्रांनाही एसएमएस करुन सांगितलं आणि अखेर ९ डिसेंबरला कॉलेज बाहेरच विष घेतलं. ५ दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या सेल्वीचा अखेर रविवारी मृत्यू झाला.
अधिक वाचा - रिक्षा चालकाकडून तरूणीचा विनयभंग, रिक्षातून घेतली उडी
काही महिन्यांपूर्वीच सेल्विच्या दोन्ही भावांचं आकस्मित निधन झालं होत. तिच्या आई-वडिलांची एकुलत्या सेल्विचा आधार उरला होता.... आता तीही या जागातून गेल्यानं या कुटुंबावर मोठा आघात झालाय.
सेल्विच्या मृत्यूमागे नेमकं कारण काय? आणि कॉलेजमध्ये न शिकणारी मुले कॉलेज बाहेर उभी राहून काय करतात? असा सवाल सेल्वीच्या पालकांनी कॉलेज प्रशासनाला विचारलाय.
अधिक वाचा - शिक्षक-विद्यार्थीनी प्रेमीयुगूलाचा आत्महत्येचा प्रयत्न, मुलीचा मृत्यू
दरम्यान, या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचं सांगत सेल्वीच्या नातेवाईकांनी तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. याबाबत माटुंगा पोलिसांशी संपर्क साधला असता कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिलाय.