एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्क्यांनी वाढ

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या महाभाई भत्त्यात सहा टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी ही घोषणा केलीय. एसटी कर्मचाऱ्यांना सध्या १०७ टक्के दरानं महागाई भत्ता दिला जातो. या निर्णयामुळं आता तो ११३ टक्के झालाय. 

Updated: Oct 22, 2015, 12:08 AM IST
एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्क्यांनी वाढ title=

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या महाभाई भत्त्यात सहा टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी ही घोषणा केलीय. एसटी कर्मचाऱ्यांना सध्या १०७ टक्के दरानं महागाई भत्ता दिला जातो. या निर्णयामुळं आता तो ११३ टक्के झालाय. 

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी परिवहन मंत्री श्री. रावते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एस. टी. कर्मचाऱ्यांना सध्या १०७ टक्के दरानं महागाई भत्ता दिला जातो. आज झालेल्या निर्णयामुळं महागाई भत्त्याच्या दरात सहा टक्के वाढ होऊन तो ११३ टक्के झाला आहे.  

आणखी वाचा - आता २१ हजार रुपयांपर्यंत पगार असणाऱ्यांना मिळेल बोनस, कॅबिनेटची मंजुरी

या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल, वित्तीय सल्लागार अनिल मोरे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महागाई भत्त्याच्या दरात वाढ करण्याच्या निर्णयाबाबतचे परिपत्रक तात्काळ नियमित करण्याच्या सूचनाही अध्यक्ष श्री. रावते यांनी यावेळी दिल्या. दरम्यान, दि. २३ ऑक्टोबर रोजी परिवहन मंत्री श्री. रावते यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.