खुशखबर, एसटी कर्मचा-यांना भरघोस पगारवाढ

एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी एक खूश खबर. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या कर्मचा-यांना भरघोस पगारवाढीची भेट मिळालीये.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 3, 2013, 07:06 PM IST

www.24taas.com,मुंबई
एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी एक खूश खबर. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या कर्मचा-यांना भरघोस पगारवाढीची भेट मिळालीये.
मुख्यमंत्री आणि एसटी कर्मचारी संघटनांची बैठक झाली. त्यात पगारवाढीचा निर्णय झाला. कनिष्ठ वेतन श्रेणीतील वाहकांच्या वेतनात ७० टक्के, चालकांच्या वेतनात ५१ टक्के, सहाय्यकांच्या वेतनात ५३ टक्के तर लिपीकाच्या वेतनात ४४ टक्के वाढ होणार आहे.
२०१२ ते २०१६दरम्यानचा हा करार कालावधी आहे. १,६६८कोटी रुपयांच्या वेतनवाढीला मान्यता देण्यात आली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी मनसेने नुकताच आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. तर, काँग्रेसप्रणित इंटक ही कामगार संघटना पगारवाढीच्या करारासाठी कोर्टात गेली होती. या पार्श्वभूमीवर एसटी कामगारांना पगारवाढ देण्यात आली आहे.
२०१२ ते २०१६ या चार वर्षांच्या वेतनकरारासाठी एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे १२४४ कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी १६६८ कोटी रुपयांची पगारवाढ मान्य करत प्रस्तावाच्या तुलनेत ४२४ कोटी रुपये वाढवून दिलेत.