हेराफेरी नेटबँकिग, एक कोटी काढणारा अटकेत

अवघ्या ४५ मिनिटांत एका बँक खात्यातून एक कोटी रुपयांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडलीय.ही हायप्रोफाईल हेराफेरी नेटबँकिगच्या मदतीने करण्यात आलीय. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली असून रक्कम ट्रांसफर केलेली खाती पोलिसांनी फ्रीज केलीत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 2, 2013, 11:52 PM IST

www.24taas.com,मुंबई
अवघ्या ४५ मिनिटांत एका बँक खात्यातून एक कोटी रुपयांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडलीय.ही हायप्रोफाईल हेराफेरी नेटबँकिगच्या मदतीने करण्यात आलीय. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली असून रक्कम ट्रांसफर केलेली खाती पोलिसांनी फ्रीज केलीत.
कोट्यवधी रुपयांची ऑनलाइन हेराफेरी केल्याप्रकरणी हा व्यक्ती पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय. ही रक्कम एका प्रायव्हेट कंपनीच्या खात्यातून काढण्यात आली. कंपनीचे संचालक अंकुर कोरणे हे बँकखातं ऑपरेट करत असत. मात्र गुरुवारी सकाळच्या सुमारास अवघ्या ४५ मिनिटांत एक कोटी रुपयांवर डल्ला मारण्यात आला...वेगवेगळ्या खात्यात ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आली.यामुळं चक्रावलेल्या अंकुरनं याची तक्रार आयटी एक्ट आणि आयपीसी अंतर्गत पोलिसांत तक्रार दाखल केली.

ऑनलाईन फसवणूकीच्या या घटनेनं पोलीसही हरकतीत आले.. त्यांनी तात्काळ याप्रकरणी एकाला बोरीवलीतून अटक केली. पोलिसांनी १२ अकाऊंट खातीही जप्त केलीत ज्यात ऑनलाइन रक्कम ट्रान्सफर करण्यात आली होती.
रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट सिस्टीमचा वापर करुन ही ऑनलाइन हेराफेरी करण्यात आल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. आता या हायप्रोफाईल हेराफेरी प्रकरणातल्या इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.