मुंबई : स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी एसटीमध्ये विभागीय स्तरावर भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. परिवहन विभागातील ६५० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत, असेही ते म्हणालेत.
स्थानिक बेरोजगार तरुणांना परिवहन विभागात यापुढे प्राधान्य देण्यात येईल. सरकारी नोकरभरतीत भूमिपुत्रांवर अन्याय होतो, अशा तक्रारी नेहमीच करण्यात येत आहेत. मात्र, राज्यात कुठेही भरती असली तरी यापुढे स्थानिकांच प्राधान्य देण्यात येईल, असे रावते यांनी स्पष्ट केले.
एसटीच्या कोकण विभागात असलेले चालक मोठ्या प्रमाणावर बदल्या करुन घेत असल्याचे आढळून आले आहे. कोकणातील भौगोलिक परिस्थितीला तोंड देणे काही चालकांना कठिण असल्याचे दिसून आलेय. त्यामुळे कोकणातील तरुणांचाच प्राधान्य देण्यात येईल. किंवा कोकणात सलग १० वर्षे काम करणे बंधनकारक अट घालण्यात येईल, असे रावते यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.