मुंबई : केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना चर्चेत असतांना, राज्यात खाजगी स्मार्ट सिटी उभारण्यात येणार आहे, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली आहे.
पेणजवळ 1 हजार एकर जमिनीवर अशी स्मार्ट सिटी उभारण्याची परवानगी सरकारने दिली असल्याची माहिती सुभाष देसाई यांनी दिली आहे.
या शहराला ऑरेन्ज सिटी असं नाव देण्यात येणार आहे, निवासी जागेसह विविध 16 विभाग आणि उद्योगांचा यात समावेश असणार आहे. स्मार्ट सिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या सिटीची उभारणी करणार आहे.
स्मार्ट सिटीच्या निर्णयाबाबत महत्वाचे टप्पे
1) केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेबरोबर राज्यात खाजगी स्मार्ट सिटी उभारणार
2) उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची माहिती
3) शासकीय 'स्मार्ट सिटी' प्रमाणे राज्यात खासगी 'स्मार्ट सिटी' उभारणार
4) पेण जवळ खासगी 'स्मार्ट सिटी' ला सरकारने दिली परवानगी
5) एक हजार एकर मधे उभी राहणार 'स्मार्ट सिटी'
6) 'ऑरेन्ज सिटी' नावाने उभी राहणार 'स्मार्ट सिटी'
7) निवासा बरोवर 16 विविध विभाग आणि उद्योगांचा समावेश असणार
8) नवी मुम्बई 'स्मार्ट सिटी इन्फ्रास्टक्चर प्रायव्हेट लिमिटेड' कंपनी 'स्मार्ट सिटी' उभारणार
स्मार्ट सिटीनंतर राज्यात आता " स्मार्ट व्हिलेज " - स्मार्ट ग्राम योजना
1) योजनेच्या आराखड्याचे काम 95 टक्के झाले आहे
2) सुरुवातीला राज्यातील 400 गावांमध्ये योजना राबवणार
3) यानुसार गावांत आपारंपारीक उर्जेचा वापर, सांडपाणी व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, स्वच्छ्ता या गोष्टींच्या सुधारणांवर भर देणार
4) याबाबत व्हिलेज डेव्हलपमेंट प्लान तयार करत आहोत
5) ग्रामविकास खात्यातील अनेक योजना एकत्र करत ही योजना तयार केली आहे
6) स्मार्ट गावांमुळे गावं स्मार्ट होत शहरांवरील ताण कमी होणार
7) लवकरच कॅबिनेटपुढे मान्यतेसाठी मांडणार
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.