राम मंदिर असेल मुंबईतल्या नव्या रेल्वे स्थानकाचं नाव

महाराष्ट्र सरकारने मुंबईतील गोरेगाव आणि जोगेश्वरी यांच्यामध्ये बनवलेल्या नव्या ओशिवारा रेल्वे स्टेशनला राम मंदिर असं नाव देण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारने याबाबतचं एक नोटिफिकेशन देखील जारी केलं आहे. 

Updated: Nov 26, 2016, 11:12 AM IST
राम मंदिर असेल मुंबईतल्या नव्या रेल्वे स्थानकाचं नाव title=

मुंबई : महाराष्ट्र सरकारने मुंबईतील गोरेगाव आणि जोगेश्वरी यांच्यामध्ये बनवलेल्या नव्या ओशिवारा रेल्वे स्टेशनला राम मंदिर असं नाव देण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारने याबाबतचं एक नोटिफिकेशन देखील जारी केलं आहे. 

वेस्टर्न लाइनवर गोरेगाव-जोगेश्वरी स्थानकाच्या मध्ये असलेल्या या नव्या रेल्वे स्थानकाचं रविवारी उद्धघाटन होणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या स्थानकाचं उद्घाटन होणार आहे. या स्थानकाचं नाव ओशिवारा असेल अशी चर्चा होती पण भाजप आणि शिवसेना सरकारला या स्थानकाला राम मंदिर असं नाव द्यायचं आहे. कारण येथे राम मंदिर चौक आणि मंदिर जवळ आहे.