भाजपने शिवसेनेला पुन्हा डिवचले, मुंबईत लागले पोस्टर

भाजपने शिवसेनेला पुन्हा डिवचले आहे. शिवसेना भवनासमोर भाजपचे होर्डिंग लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळ्यापैशा विरोधतील लढाईला बाळासाहेबांचे आशीर्वाद या पोस्टरच्या माध्यमातून दिसून येत आहे.

Updated: Nov 26, 2016, 09:15 AM IST
भाजपने शिवसेनेला पुन्हा डिवचले, मुंबईत लागले पोस्टर title=

मुंबई : भाजपने शिवसेनेला पुन्हा डिवचले आहे. शिवसेना भवनासमोर भाजपचे होर्डिंग लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळ्यापैशा विरोधतील लढाईला बाळासाहेबांचे आशीर्वाद या पोस्टरच्या माध्यमातून दिसून येत आहे.

काळ्या पैशाचा खात्मा, हेच अच्छे दिन, असे बॅनर भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी हे लावले आहे. त्यामुळे पुन्हा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप-शिवसेनेत वाद उफाळण्याची शक्यता आहे. 

भाजपाचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी शिवसेनाभवनसमोर लावले पोस्टर हे शिवसेनेला चपराक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, कोणताही वाद उफाळू नये म्हणून भाजपकडून लावण्यात आलेले पोस्टर तात्काळ हटविण्यात आले आहे.