मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थिर असल्याचं म्हटलं आहे. मध्यावधी निवडणुकांची कोणतीही शक्यता नाही, एकाही आमदाराला वाटत नाही की, पुन्हा निवडणूक लढवावी, त्यामुळे सरकार स्थिर असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात, अस्थिर असलेलं फडणवीस सरकार केव्हाही ढासळू शकतं, असं भाकीत शरद पवारांनी केलं आहे.
अलिबाग इथं राष्ट्रवादीचं दोन दिवसांचं चिंतन शिबीर भरलंय. या शिबिरासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इथं जमा झालेत. त्यांच्यासमोर बोलताना पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हे भाष्य केलंय.
'फडणवीस सरकार जास्त काळ टिकणार नाही, निवडणुका केव्हाही होऊ शकतात, तयारीला लागा' असे आदेशच पवारांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलेत.
शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज घेता यावा, यासाठी राज्यात २ हजार ६५ स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
राज्यात 40 हजार गावांपैकी 19 हजार 69 गावांमध्ये 50 % पेक्षा पैसवारी कमी आहे, त्यामुळे या गावांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे, यामुळे राज्यासमोर मोठं संकट उभे आहे, या संदर्भात ७ दिवसात दुष्काळासंदर्भात मेमोरेंडम केंद्राला पाठवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.