मुंबई : महापौर विशेष विकास निधीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेने केलाय.
महापौर विशेष विकासनिधी म्हणून १०० कोटींचा निधी विकास कामांसाठी दिला जातो. मात्र, महापौरांनी निधीवाटपासाठी नगरसेवक आणि कंत्राटदारांकडून टक्केवारी घेतल्याचा आरोप मनसेने केला.
महापौर आणि संदीप देशपांडे यांच्यातील फोनवरील संभाषणाची धक्कादायक क्लिप उघड झालीय. महत्त्वाचे म्हणजे महापौरासोबत मनसेचे नगरसेवक आणि माजी गटनेते दिलीप लांडे व नगरसेविका वैष्णवी सरफरे यांनीही कंत्राटदाराच्या माध्यमातून विकासनिधी मिळवल्याचा उल्लेख या संभाषणात आढऴतोय. त्यामुळे ते देखील अडचणीत सापडलेत.
वाचा, नेमकं काय बोलणं झालं... संदीप देशपांडे आणि महापौरांमध्ये!
या संपूर्ण प्रकरणाची एसीबीकडून चौकशी करावी अशी मागणी करण्यात आलीय. या मागणीसाठीच दोन दिवसांपूर्वी मनसेनं एसीबी प्रमुख प्रविण दीक्षित यांची भेट घेऊन तक्रार केली होती. कोल्हापूरच्या महापौरांपाठोपाठ आता भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आता मुंबईच्या महापौरही अडचणीत आल्यात.
ऐकूयात, संदीप देशपांडे आणि महापौर स्नेहल आंबेकर यांच्यातलं संभाषण...
(टीप : झी मीडिया मात्र या ऑडियो क्लिपच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.