मुंबई: मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरुन उड़ी मारुन पुन्हा एका व्यक्तीनं आत्महत्या केली. महिनाभरातली सी लिंकवरून आत्महत्येची ही दुसरी घटना आहे.
सी लिंकवरुन आत्महत्या करण्याच्या घटना वाढताहेत. गेल्या सहा महिन्यात आत्महत्येची ही सहावी घटना आहे. आज सकाळी ७च्या सुमाराला एका वॅगनार गाडीतून एक ४०-४५ वर्ष वयाची व्यक्ती उतरली आणि त्यानं सी लिंकच्या वांद्र्याच्या दिशेला असलेल्या एका कोपऱ्यातून समुद्रात उड़ी मारली.
उड़ी मारणाऱ्या-या व्यक्तीचं नावं विक्रम वासुदेव असून तो एक व्यावसायिक आहे. अग्नीशमन दलाचे जवान आणि पोलीस मृतदेहाचा शोध घेतायत. आत्महत्येचं कारण अजून स्पष्ट झालं नसून, पोलीस त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.