मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला त्यामुळे पक्षाची पिछेहाट झाली असे मी अजिबात मानत नाही असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
आमच्या जागा कमी झाल्या असल्या तरी मागील निकालांची आताच्या निकालांशी तुलना होवू शकत नाही . राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेत राज्यातील सर्व प्रभारी , पदाधिकारी , जिल्हाध्यक्ष यांची बैठक 3 मार्च रोजी होणार आहे त्यावेळी निकांलाबाबत चिंतन करून पुढील वाटचालीसंदर्भात दिशा ठरवली जाईल असेही तटकरे यांनी सांगितले.