'ती जागा पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीची नाही'

सुप्रिया सुळेंच्या पवार चॅरिटेबल ट्रस्टनं मुंबईतील खोतांच्या जागेवर अवैध कब्जा केल्याचा आरोप होत आहे.

Updated: Oct 22, 2016, 07:24 PM IST
'ती जागा पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीची नाही' title=

मुंबई : सुप्रिया सुळेंच्या पवार चॅरिटेबल ट्रस्टनं मुंबईतील खोतांच्या जागेवर अवैध कब्जा केल्याचा आरोप होत आहे. या आरोपावर सुप्रिया सुळेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मी पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट चे काम पहाते. या ट्रस्टच्या वतीने चांदिवली येथे शाळा सुरु केली आहे, पवईला नाही. ज्या जमिनीवर ही शाळा आहे ती जागा शैक्षणिक संकुल म्हणून आरक्षित आहे. ही जमीन ट्रस्ट ने भाडेतत्वावर घेतलेली आहे. पवार पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट चा सदर जागेवर कुठलाही मालकी हक्क नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे.

मुंबईतील खोतांच्या जमीनीवर अवैध कब्जा मिळवल्या प्रकरणी चौकशी करा असा आदेश मुंबई हायकोर्टानं मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ४५० एकर जमीनीचं हे प्रकरण असून यांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांच्या पवार चॅरिटेबल ट्रस्टचाही समावेश आहे अशी याचिका भूषण सामंत यांनी केली होती.

अनेक मोठ्या बिल्डर्सचाही यांत समावेश आहे. खोत Abolition Act १९४९ अंतर्गत खोतांच्या जमीनी सरकारकडे जाणं अपेक्षित असताना त्या जमीनी बळकावण्यात आल्या, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता. तसंच सरकारही या जमीनी परत मागत नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. चौकशीचे आदेश देऊन ही याचिका निकाली काढण्यात आली आहे.