स्वामी नारायण मंदिरात महिलांचा घोर अपमान

एकीकडं गोहत्या बंदी केल्याबद्दल सरकारची पाठ थोपटणारी मंडळी, महिलांना मात्र कशी अपमानास्पद वागणूक देतात, याचा साक्षात्कार आज पाहायला मिळाला. मुंबईसारख्या शहरातही महिला-पुरूष भेदाभेद  होतो.

Updated: Apr 30, 2015, 07:38 PM IST
स्वामी नारायण मंदिरात महिलांचा घोर अपमान title=

मुंबई : एकीकडं गोहत्या बंदी केल्याबद्दल सरकारची पाठ थोपटणारी मंडळी, महिलांना मात्र कशी अपमानास्पद वागणूक देतात, याचा साक्षात्कार आज पाहायला मिळाला. मुंबईसारख्या शहरातही महिला-पुरूष भेदाभेद  होतो.

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, जिथं नारीची पूजा केली जाते, तिथं देवता राहतात, असं मानलं जातं.

महालक्ष्मी, सरस्वती, दुर्गामाता अशा नारी रूपातल्या देवींना देव्हाऱ्यात स्थान देणारी आपली भारतीय संस्कृती, अगदी गाईचीही पूजा करण्याची आपली परंपरा.

स्वामी नारायण मंदिरात घडली घटना
मात्र या भारतीय संस्कृतीला हरताळ फासणारी घटना गुरूवारी स्वामी नारायण मंदिरात घडली.  गोवंश हत्याबंदी कायदा करून गाईंना वाचवलं, म्हणून मुख्यमंत्र्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

मात्र यावेळी महिलांचा घोर अपमान करण्यात आला. काय तर म्हणे महिलांमुळं साधूसंताचा संयम ढळतो. त्यामुळं साधू-संतांच्या रांगेत महिलांना बसू दिलं गेलं नाही. अपमानास्पद वागणूक देत, त्यांना उठवण्यात आलं.

महिला-पुरूष भेदाभेद करणाऱ्या आयोजकांनी मुंबईच्या उपमहापौर अलका केरकर यांनाही अपमानास्पद वागणूक दिली. सन्मानानं व्यासपीठावर बसण्याऐवजी त्यांना चौथ्या रांगेत बसवण्यात आलं.

या अपमानास्पद वागणुकीविरूद्ध महिलांनी आवाज उठवल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनीही झाल्या प्रकाराबद्दल निषेध नोंदवला.

एकीकडे गाईची पूजा करायची आणि दुसरीकडे महिलांचा मात्र अपमान करायचा, ही कसली संस्कृती? निदान मुख्यमंत्र्यांनी कान उपटल्यानंतर तरी आता आयोजकांना सुबुद्धी यायला हरकत नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.