मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त लेख लिहिणाऱ्या तहलका मासिकाला, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनुल्लेखानं मारलं आहे. तहलका मासिक कुठे आहे. त्याचा एक संपादक लैंगिक शोषण प्रकरणात सध्या तुरुंगात आहे की बाहेर आलाय असे प्रश्न विचारत, उद्धव ठाकरे यांनी तहलकाबाबत उदासिनता दाखवली.
'तहलका' बंद करण्याची मनसेची मागणी
तहलकाच्या ताज्या अंकात बाळासाहेब ठाकरेंबाबत आक्षेपार्ह लेख लिहिला गेलाय. त्यावर उद्धव यांनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान तहलकाच्या त्या लेखाविरोधात, मनसे नेते बाळा नांदगावकर आणि सरचिटणीस राजेंद्र शिरोडकर यांनी शनिवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. सातत्यानं वादग्रस्त लिखाण प्रसिद्ध करणारं हे साप्ताहिक कायमस्वरुपी बंद करण्याची मागणीही त्यांनी केली.
'तहलका'च्या यावेळच्या अंकामध्ये 'हू इज द बिगेस्ट टेररिस्ट' या शीर्षकांतर्गत एक लेख छापण्यात आला आहे. ज्यामध्ये याकूब मेमन, दाऊद इब्राहिम, भिंद्रनवाले यांच्यासोबत दहशतवादी म्हणून चक्क बाळासाहेबांचा फोटो छापण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.