दहशतवादी हल्ला : टेररिस्ट इंश्युरन्स नवा पर्याय

जगभरात होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांनी प्रत्येकजण मनातून धास्तावलाय. त्यामुळे टेररिस्ट इंश्युरन्स हा एक चांगला पर्याय ठरणार आहे. भारतात टेररिस्ट इंश्युरन्सखाली केवळ ५३० रूपयांत १० लाख रूपयांचं कव्हर मिळू शकेल. पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इंश्युरन्स कंपन्या नव्याने या इंश्युरन्सचा प्रचार करायला लागली आहेत. 

Updated: Nov 20, 2015, 03:53 PM IST
दहशतवादी हल्ला : टेररिस्ट इंश्युरन्स नवा पर्याय  title=

मुंबई : जगभरात होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांनी प्रत्येकजण मनातून धास्तावलाय. त्यामुळे टेररिस्ट इंश्युरन्स हा एक चांगला पर्याय ठरणार आहे. भारतात टेररिस्ट इंश्युरन्सखाली केवळ ५३० रूपयांत १० लाख रूपयांचं कव्हर मिळू शकेल. पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इंश्युरन्स कंपन्या नव्याने या इंश्युरन्सचा प्रचार करायला लागली आहेत. 

पॅरीसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात झालेल्या जीवितहानीची भरपाई कोणी करू शकणार नाही. पण भविष्यात देव न करो पण तुमच्यासोबत असा काही प्रकार घडला तर त्याची आर्थिक भरपाई इंश्युरन्स कंपन्या करू शकतील. 

पॅरिस हल्ल्यानंतर देशातल्या जनरल इंश्युरन्स कंपन्याने नव्याने टेररिस्ट इंश्युरन्सचा प्रचार करायला लागल्या आहेत. खर म्हणजे जनरल इंश्युरन्स कंपन्या टेररिस्ट इंश्युरन्सला हाऊसिंग इन्श्युरन्सशी जोडतात. त्याचा प्रिमियमही खूप स्वस्त असतो. उदाहरणार्थ तुम्ही १ लाख रूपये सम एश्युअर्डची हाऊसिंग पॉलिसी घेतली तर त्याला फक्त ४५ रूपये प्रिमियम पडेल. यात जर तुम्ही टेररिस्ट इंश्युरन्स ऍड केला तर त्यात फक्त ८ रूपये जास्त द्यावे लागतील. म्हणजेच १० लाख रूपयांची हाऊसिंग पॉलिसी घेतलीत तर फक्त ५३० रूपये प्रिमियम लागेल. 

वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरात या विम्याची मागणी वाढली. मात्र याची व्याप्ती अजूनही मोठी हॉटेल्स, एअरपोर्ट, स्टेशन्स, मंदिरं, चर्चेस यापुरतीच मर्यादीत आहे. सर्वसाधारणपणे हल्ल्यात प्रॉपर्टीचं नुकसान, जीवितहानी, किंमती  मालाचं नुकसान याची भरपाई देते. भारतात ताजमहाल हॉटेलवर झालेल्या हल्ल्यात इन्शुरन्स कंपन्यांनी आजवरचा सर्वाधिक म्हणजे ३७० कोटी रूपयांचा क्लेम ताज ग्रुपला दिला होता.

देशातली इन्श्युरन्स कंपनी जीआयसी आरईने याआधीच टेररिस्ट इन्शुरन्स पूल तयार केलाय. सर्व जनरल इन्शुरन्स कंपन्यांचा प्रिमियम या पूल मध्ये जमा होतो. सध्या हा पूल ५०० कोटींचा आहे. जेवढे जास्त ग्राहक टेररिस्ट इन्शुरन्स खरेदी करतील तेवढा या पूलचा आकार वाढेल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.