दादर येथे इमारतीला भीषण आग, २ जण गंभीर

दादर पश्चिमेकडील फूलमार्केट परिसरातील अमर-उमर या इमारतीला आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत २ जण गंभीर जखमी झालेत तर ३० ते ३५ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश झाले. जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

Updated: Nov 20, 2015, 09:05 AM IST
दादर येथे इमारतीला भीषण आग, २ जण गंभीर title=

मुंबई : दादर पश्चिमेकडील फूलमार्केट परिसरातील अमर-उमर या इमारतीला आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत २ जण गंभीर जखमी झालेत तर ३० ते ३५ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश झाले. जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. फूलमार्केटजवळील सुमारे १०० वर्षे जुन्या असलेल्या या रहिवासी इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर रूममध्ये आगीची ठिणगी पडली आणि काही  मिनिटांतच संपूर्ण इमारत आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली. 

आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या १६ गाड्यांची मदत घेण्यात आली. दरम्यान, पहाटे घडलेल्या घटनेमुळे एकच घबराट पसरली. अग्निशमन दलाच्या जवानानी ३० ते ३५ जणांना सुखरुप बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.